top of page
Search

PayTM बीग अपडेट! अखेर आली डेडलाईन, जाणून घ्या काय सुरु आणि बंद...

Paytm बँकेसंबंधी आरबीआयने निर्णय घेतला असून 15 मार्चची डेडलाईन दिली होती. दरम्यान पेटीएम बँक बंद होणार असताना अनेकजण गोंधळले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे. RBI च्या निर्देशानुसार, 15 मार्च 2024 नंतर पेटीएम पेमेंट बँकेवर कोणतेही व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत, बँकेने ग्राहकांना पेटीएम पेमेंट बँकेत असलेली रक्कम इतर कोणत्याही बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा सल्ला दिला आहे.पेटीएम पेमेंट बँकेच्या काही सेवांवर बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली होती, ज्यासाठी एक अंतिम मुदत देखील निश्चित करण्यात आली होती आणि ती तारीख जवळ आली आहे. 15 मार्चनंतर, वापरकर्ते पैसे परत करणे, पैसे काढणे यासह अनेक सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत, 15 मार्चपासून पेटीएम पेमेंट बँकेच्या कोणत्या सेवा उपलब्ध असणार नाहीत ते जाणून घेऊया.


15 मार्चनंतर या 8 सेवा बंद होतील

अॅपवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, Paytm QR Code, Paytm Soundbox आणि Paytm Card Machine यापुढेही सुरु राहणार आहे.


  1. फास्टॅगचा वापरही बंद होणार आहे. जोपर्यंत शिल्लक रक्कम आहे तोपर्यंत वापरकर्त्यांना पेटीएम फास्टॅग वापरण्याचा पर्याय मिळेल. यानंतर, वापरकर्त्याला फास्टॅगमध्ये पैसे भरण्याचा पर्याय मिळणार नाही.

  2. पेटीएम पेमेंट्स बँक वापरकर्त्यांसाठी वॉलेट सेवा बंद केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना त्यांच्या वॉलेटचे पैसे इतर कोणत्याही बँक खात्यात हस्तांतरित करण्याची सुविधा मिळेल.

  3. पेटीएम पेमेंट्स बँकिंग सेवेअंतर्गत, वापरकर्ते UPI किंवा IMPS द्वारे पैसे काढू शकतील, परंतु 15 मार्च नंतर, तुम्हाला दुसऱ्या बँकेतून व्यवहार करावे लागतील. याशिवाय, इतर सेवा आहेत ज्या पेटीएम पेमेंट्स बँक वापरकर्ते घेऊ शकणार नाहीत.

  4. बँक खात्यासाठी टॉप-अप सेवा

  5. पेटीएम बँकेत दुसऱ्या बँक खात्यातून पैसे मिळणे

  6. डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर

  7. पगार ट्रांसफर करणे

  8. पेटीएम फास्टॅग बॅलन्स इतर फास्टॅगवर ट्रान्सफर करण्याची सुविधा

पेटीएम वापरकर्त्यांसाठी अडचणी वाढू शकतात कारण 15 मार्च 2024 नंतर वापरकर्त्यांना 8 सेवांचा लाभ मिळणार नाही.


'या' सेवा पेटीएमवर 15 मार्चनंतरही सुरू राहतील

  1. पैसे काढणे- तुम्ही पेटीएम पेमेंट बँक खात्यातील सध्याचे पैसे काढू शकाल.

  2. वॉलेट मनी- पेटीएम पेमेंट्स बँक वापरकर्ते वॉलेटमधील पैसे देखील काढू शकतील.

  3. कॅशबॅक- कॅशबॅक रक्कम वापरकर्त्यांच्या खात्यात राहील.

  4. रिफंड- रिफंड पैसे देखील बँक खात्यात असतील.


Paytm युजर्स सहजपणे रिचार्ज आणि बिल पेमेंटही करु शकतात. 15 मार्चनंतरही सेवा सुरु राहील.

तसंच Paytm युजर्स वॉलेटचा वापर करु शकतात. 15 मार्चनंतर वॉलेटमध्ये पैसे असल्यास ते ट्रान्सफर करु शकतात. पण 15 मार्चनंतर त्यात पैसे टाकू शकत नाही.

Paytm बँकेच्या सेवा वगळता इतर सेवा आधीप्रमाणेच सुरु राहतील.

NCMC कार्डचा FASTag प्रमाणे वापर करु शकता. पण 15 मार्चनंतर त्याला रिचार्ज करु शकत नाही.


तुम्ही पेटीएम अॅपवर गेलात आणि Important Update वर क्लिक केलं तरी कोणती सेवा बंद होणार आणि कोणती सुरु राहणार याची माहिती मिळेल.

Weather

Frequently

Select Your Choice

वंचित बहुजन आघाडी लातूरचे अधिकृत उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा...
Play Video
bottom of page