लातुरातील दोन साखर कारखाने ईडीच्या चौकशीच्या रडारवर; संभाजी पाटील निलंगेकरांचा गौप्यस्फोट...
- MahaLive News
- Jul 3, 2021
- 1 min read

लातूर- राज्यातील थकीत कर्जाचा डोंगर असलेल्या साखर कारखान्यांच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या व्यवहाराची सध्या ईडीकडून चौकशी सुरू असून यात लातूर जिल्ह्यातील दोन कारखान्याबाबत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे. यामुळे गैरव्यवहाराशी संबंधित जिल्ह्यातील कारखानेही चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असून यातून बऱ्याच गोष्टी उघडकीस येणार असून चौकशीत शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकणारे उघडे पडतील, गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकरयांनी केल. सहकाराचा स्वाहाकार करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर उभे असलेले सहकारी साखर कारखाने अत्यंत कवडीमोल किंमतीने खरेदी केले आहेत. त्याची चौकशीही आता ईडीकडून होणार आहे. राज्यभरात याच पद्धतीने सहकारी साखर कारखाने विक्रींतून मोठा गैरव्यवहार झाला असून सर्वच कारखाने आता ईडीच्या रडारवर आले आहेत. चौकशीमुळे या कारखान्यांना लवकरच चाप लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पैशातून उभारलेले सहकारी कारखाने दिवाळखोरीत काढण्यात आले. वैयक्तीक मालकी असलेल्याप्रमाणे हे कारखाने कवडीमोल किंमतीत विकले आणि विकत घेतले. अत्यंत गंभीर बाब असून सहकाराच्या नावावर स्वाहाकार करुन यातून शेतकऱ्यांना लुबाडण्याचे पाप केलेल्यांचे पितळ उघडे पडणार आहे. जिल्ह्यात अहमदपूर व उदगीर तालुक्यातील साखर कारखाने चुकीच्या पद्धतीने खरेदी केले आहेत. हे कारखाने खरेदी करणाऱ्यांचा खरा चेहरा उघड होणार असल्याचा विश्वास आमदार निलंगेकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील दोन कारखाने ईडीच्या रडारवर आहेत. सहकारातून स्वतःच्या कुटूंबाची समृद्धी व कूटूंबाचा विकास करणारे हे लोक सहकार सहर्षी व सहकार सम्राट असा किताब घेऊन मिरवताना दिसतात. वास्तविक हे नेते कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटत आहेत तेदेखील या माध्यमातून उघडे पडेल, असा दावाही आमदार निलंगेकर यांनी केला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Comments