Search
लातूर शहरातील एमआयडीसीतील कायझन होंडा शोरूममध्ये पाण्याच्या टाकीत सापडला तरुणाचा मृतदेह...
- MahaLive News
- Jun 9, 2021
- 1 min read

#लातूर- घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू. लातूर शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या कायझन होंडा शोरूम मध्ये काम करणाऱ्या सुशांत चंद्रकांत कांबळे (वय 29) या तरुणाचा मृतदेह शोरूमच्या दुसऱ्या मजल्यावरील 1000 लीटर पाण्याची टाकी मृत अवस्थेत सापडला,

पोलिसांनी मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढला असून पोस्टमार्टम साठी मंगळवार दि. 9 जून रोजी विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदर घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे असे पोलिसांनी सांगितले. आकाश चंद्रकांत कांबळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. गुन्हा रजिस्टर नंबर 206/21 कलम 174 सीआरपी नुसार मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाचा मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments