Search
शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत; सुप्रिया सुळे...
- MahaLive News
- Nov 9, 2022
- 1 min read

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रात 14 दिवस ही यात्रा राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या यात्रेत सहभागी होणार नाहीत. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. शरद पवार जरी सहभागी होणार नसले तरी इतर काही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सहभागी होणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.
Comments