top of page
Search

छत्रपती संभाजीनगर रात्री 11 नंतर बंद; पोलीस आयुक्तांचा निर्णय, हॉटेल व्यावसायिकांची नाराजी...


छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. रात्री 11 नंतर शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी प्लॅन तयार केला आहे. सुरुवातीला सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीत 11 वाजेनंतर आस्थापना उघड्या राहणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.


दरम्यान, शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले आहेत. घरात, रस्त्यावर, गल्लीत कोठेही या घटना घडत आहेत. त्यामुळे नियमानुसार रात्री ११ वाजेनंतर शहर बंद झाले पाहिजे; अशी भूमिका पोलिस आयुक्त लोहिया यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी प्लॅन तयार केला आहे. सुरुवातीला सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीत ११ वाजेनंतर आस्थापना उघड्या राहणार नाहीत. याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. रात्री साडेदहा वाजेनंतर सहा पथके एकाच वेळी रस्त्यावर उतरतायत. ती वेगवेगळ्या भागांत जाऊन आस्थापना बंद करण्याचे कालपासून आवाहन सुरू केले आहे.


आवाहनाला प्रतिसाद देऊन जे बंद करतील त्यांचे स्वागत केले जाते. मात्र, जिथे विरोध होईल तेथे कायद्याचा बडगा उगारला जात आहे. तर दुसरीकडे या निर्णयावरून हॉटेल्स व्यावसायिकांनी नाराजी दर्शवली आहे. तसेच हॉटेल्स व बार सुरू करण्यासाठी राज्य शासनाने रात्री दीड वाजेपर्यंतची मुदत दिली असल्याचे परिपत्रक देखील यावेळी हॉटेल व्यवसायिकांकडून दाखवण्यात आले. अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असल्यास आमच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा, अशी अपेक्षा हॉटेल व्यवसायिकांनी व्यक्त केली. तर या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्तांना भेटून त्यांना निवेदनही देणार असल्याचे हॉटेल्स व्यावसायिकांनी सांगितले.

@महाLive News

#छत्रपतीसंभाजीनगर

Weather

Frequently

Select Your Choice