top of page

पुण्यात 80 विद्यार्थ्यांची बस ४० फूट खोल दरीत कोसळली....

पुणे- मावळ तालुक्यात असणाऱ्या लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला फिरण्यासाठी आलेल्या पेण येथील खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट जवळ असलेल्या ४० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पेणच्या एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला आहे. पुण्यातील मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी ही दुर्घटना घडली असून बस 40 फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये 72 विद्यार्थी आणि शिक्षकांसह एकूण 80 जण होते. यात जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ग्रामीण पोलिसांच्या मदतीने काही स्थानिकांनी जखमींना बाहेर काढले आहे. सुदैवाने बसमधील सर्वजण सुखरुप आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, मावळ तालुक्यातील लोहगड हा पर्यटनासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा गड आहे. या ठिकाणी पेण येथून ८० जण बसमधून फिरण्यासाठी आले होते. त्यात ७२ विद्यार्थी, चार शिक्षक, आणि इतर कर्मचारी होते. लोहगड किल्ल्याजवळ असलेल्या दुधिवरे खिंडीत ही बस कोसळली. जखमी असलेल्या तिघांना लोणावळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.


लोणावळा आणि सोमाटणे येथील रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस आणि मावळातील शिवदुर्ग मित्र मंडळाच्या पदाधिकार्यांनी जखमींना बाहेर काढले. स्थानिक ग्रामस्थांची यावेळी मोठी मदत झाली. अचानक झालेल्या अपघाताने विद्यार्थी घाबरून गेले होते. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.


या घटनेने चाकलकाविरोधत कारवाई करण्याचे काम सुरू आहे. जखमींना लोणावळा, सोमाटणे येथील खासगी रुग्णालय व काले काॅलनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींना लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर काढले. यांच्या सहकार्याने सर्व पर्यटक सुखरूप आहेत.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page