MPSC; संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर; परीक्षा दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित...
- MahaLive News
- Aug 4, 2021
- 1 min read

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ती दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती दिली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलंय की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक ९ एप्रिल, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सूचनानुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिध्दीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती.

यासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या दिनांक ३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार प्रस्तुत परीक्षा शनिवार दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात ४ येईल. कोव्हिड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणा-या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील, असं पत्रकात म्हणण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोजाने परिक्षेचे नियोजन पुढे ढकलले होते.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News
Comments