कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यामुळे साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाऊन...

सातारा- जिल्हा आजपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून अत्यावश्यक सेवाही सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच सुरु राहणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन केला जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे शनिवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यात सध्या शनिवार आणि रविवार वगळता वेळेच्या मर्यादेत दुकानं सुरु होती. परंतु, जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साताऱ्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत सुरु राहील, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सातारकरांनी आता घरातच राहून प्रशासनाच्या आदेशाचं पालन करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज सातारा
Mahalive News
Comments