Search
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस; भेटीला आलेल्या भगिनीला अश्रू अनावर...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी पत्र देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत अधिक खालावत चालली आहे. त्यांनी अन्न पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यास मनाई केली आहे. त्यांच्या भेटीसाठी अनेक लोक अंतरवाली सराटी येथे येत आहेत. नांदेडहून रेखा पाटील नावाच्या महिला भगिनीने जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांची खालावलेली प्रकृती पाहून आरोग्यसेविका असलेल्या रेखा पाटील यांना रडू कोसळले. तुम्ही सगळं बंद करा अन् माझ्या भावाचा जीव वाचवण्याचं बघा, असे त्या म्हणाल्या.
留言