top of page
Search

पुण्यात IT पार्कमध्ये भीषण आग, कर्मचाऱ्यांची टेरेसवर धाव, प्रयत्न सुरूच...


पुणे- कल्याणीनगर मारीगोल्ड आयटी पार्कला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे आयटी पार्कमध्ये सकाळच्या शिफ्टला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही जण हे टेरेसवर पळाले होते. तर काही जण वरच्या मजल्यावर आडकले होते. अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. उंच इमारत असल्यामुळे उंच शिडीचा वापर करून चार कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं आहे.


तर अजून काही कर्मचारी घटनास्थळी आडकले आहेत. कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी गच्चीवर धाव घेतली. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका झाली आहे. तर अजून काही नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरेसवर जवळपास ३० लोक अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी पुण्यातल्या मारीगोल्ड आयटी पार्कमध्ये स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. मारीगोल्ड आयटी पार्कमध्ये काम करणारे कर्मचारी हे वरच्या मजल्यावर अडकले असल्याचं दिसत होतं. तर काही कर्मचारी हे आग लागल्यामुळे टेरेसवर पळाले होते. त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. तर अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बचावकार्य सुरू आहे.


गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साह्याने कुलुप तोडत चोहोबाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार अथवा नागरिक अडकला नाही याची खाञी केली.

Weather

Frequently

Select Your Choice