top of page
Search

रायगड, ठाण्याला क्रीडा संकुलाच्या उभारणीला मंजुरी मंजुरी; खेळाडूंकरिता हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध..


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत माणगाव विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंकरिता हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश पवार यांनी दिले.


सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांसाठी माणगाव हे मध्यवर्ती आहे. या चार जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरेल. या विभागीय क्रीडा संकुलासाठी ४० ते ५० एकर जागा आवश्यकअसून ती जिल्हा प्रशासनाने तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. क्रीडा संकुलापर्यंत जाणारा मार्गही प्रशस्त असला पाहिजे त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.


माणगाव येथील नियोजित विभागीय क्रीडा संकुलासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही महामार्गालगत असल्याने कोकणातील रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चारही जिल्ह्यातील तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडूंसाठी हे ठिकाण सोयीचे आहे. या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या विभागीय क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करताना आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. नवी मुंबईतील स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या उभारणीचे प्रलंबित कामही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिले.

Weather

Frequently

Select Your Choice