top of page
Search

द बर्निंग कारचा थरार; धावत्या BMW ने अचानक घेतला पेट; दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी नाही...

Writer: MahaLive NewsMahaLive News

मुंबई- धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना मुंबई शहरात घडली आहे. आलिशान कार म्हणून ओळख असलेल्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. ही घटना मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर घडली आहे. मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळून जाणाऱ्या आलिशान कारला अचानक आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. गाडीला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली आणि तो गाडीतून बाहेर पडला. ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही क्षणातच संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. घटनास्थळी तात्काळ वाहतूक पोलिसांनी व अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून या घटनेत आगीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र, आलिशान कारला अचानक आग लागल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज मुंबई


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page