जावायाने कोयत्याने सासूचा खून करून स्वत:ला घेतले पेटवून...

लातूर- पत्नी विभक्त रहात असल्याचा राग मनात धरून जावायाने कोयत्याने वार करून सासूचा खून केल्याची घटना दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता विरहनुमंतवाडी ता. लातूर येथे घडली. तसेच मुलाच्या मानेवर वार करून जखमी करत स्वत:ला जाळून घेत आत्माहत्या केली. उदगीर येथील रजनीकांत सुर्यकांत वेदपाठक (वय ३८ रा. सोमनाथपूर राड उदगीर) यांचा लातूर तालुक्यातील विरहणमंतवाडी येथील चंद्रसेना वेदपाठक (वय ५५) यांच्या मुलीशी झाला होता. गेल्या कांही दिवसापासून सासू पत्नीला नांदायला पाठवत नसल्याचा राग मनात होता. पत्नी व मुलगा कार्तीक (वय ७) यांना घेवून जाण्यासाठी विरहणुमंतवाडी येथे रजनीकांत आला होता. पत्नी कामा निमित्त बाहेर गेली होती.
यावेळी रजनीकांतचा सासू सोबत वाद झाला. जावायाने रागाच्या भरात सासूवर कोयत्याने तब्बल तेरा वार करून खून केला. तसेच जवळ असलेला मुलगा कार्तीकच्या मानेवर वार करून जखमी केले. त्याच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सासुला व मुलाला कोयत्याने मारल्यानंतर स्वत:ला पेटवून घेतले. उपचारासाठी जळालेल्या आवस्थेत शासकीय रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. कार्तीकवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सुमित वेदपाठ यांच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात कलम ३०२, ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा अधिक तपास कोल्हे हे करीत आहेत.
Comments