top of page
Search

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याने वाहतूक मंदावली; सुदैवाने जीविहितहानी नाही...


मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ रात्री 11:30 च्या सुमारास दरड कोसळली. यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन सुरू झाल्या आहेत. दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, तसेच महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घाटात पडलेली दरड काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. दरड काढण्यासाठी जेसीबी यंत्र, डंपर मागविण्यात आले आहेत. दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान, वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तीन मार्गिकेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वळविण्यात आली आहे.

Weather

Frequently

Select Your Choice