top of page
Search

30 मुलांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली

परभणीमधील गंगाखेड तालुक्यात मुलांना शाळेत घेऊन जाणारी एक खासगी बस उलटली आहे. यात चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 30 विद्यार्थ्यांची बस धनगरमोहा ते हरंगुल रस्त्यावरुन जात असताना अचानक रोडखाली उतरुन शेतात उलटली. हे पाहताच जवळच्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलांना बाहेर काढले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Weather

Frequently

Select Your Choice