औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाचे सहा दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...
- MahaLive News
- Aug 18, 2021
- 1 min read

हिंगोली- औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडले असून पुर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून पाण्याची आवक बघता बुधवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात ४ हजार ३६८ क्यूसेक्स विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. यात एक, चार, सात, आठ, अकरा व चौदा क्रमांक दरवाज्याच्या समावेश आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पुर्णा नदी औंढा, वसमत तालुक्यातील काही गावांसह परभणी जिल्ह्याकडे जाते. धरणाच्या लाभक्षेत्रात मागच्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. तसेच अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारपासून या धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे नदी काठावरील गावाना सतर्कता इशारा देण्यात आला होता. बुधवारी देखील आवक वाढल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज हिंगोली
Mahalive News
Comentários