कृषी विभागात तब्बल ९५२ पदांसाठी भरती; असा करा अर्ज दाखल...

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय मोठी आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कृषी विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागात काही रिक्त पदांसाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार कृषी विभागातील कृषी सेवकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्यातील कृषी विभागात काम करण्यासाठी इच्छुकांसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत .राज्यातील कृषी विभागातील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. कृषी सेवक पदासाठी ९५२ जागा भरण्यात येणार आहे.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासाठी ही भरती केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे , ठाणे या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या जागेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख ३१ ऑगस्ट २०२३ आहे.
कृषी विभागातील कृषी सेवक पदांसाठी प्रति महिना १६ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. हे वेतन कृषी सेवक पदासाठी हे वेतन निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे कृषी विषयांमधील पदवी असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराची कृषी सेवक पदी एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवाराच्या कामानुसार पुढील दोन वर्षे पुन्हा नियुक्ती करण्यात येणार असून कृषी सेवक पदी काम करण्याचा कालावधी तीन वर्षांचा असेल.
या जिल्ह्यात एवढ्या पदासांठी भरती
औरंगाबाद- १९६
लातूर-१७०
नाशिक- ३३६
कोल्हापूर-२५०
अमरावती- १५६
नागपूर- ३६५
पुणे- १८२
ठाणे -२४७
इच्छुक उमेदवारांना कृषी सेवक पदासाठी कृषी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. कागदपत्रे जोडल्यावरच अर्ज दाखल केला जाईल. या संदर्भातील सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
Comments