top of page

पोलीस कोठडीतून पळून गेलेल्या आरोपीलाअटक; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी...


लातूर- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मध्ये पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 379/2022 कलम 307, 323, 506, 143, 147, 148, 1490 भादवी.135 मपोका, प्राणघातक हल्ला, दंगा अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी लखन ईश्वर कसबे राहणार करडखेड तालुका उदगीर याला अटक करण्यात आली होती. वर नमूद गुन्ह्यात तो अटकेमध्ये असताना उदगीर ग्रामीण पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून दिनांक 02/09/2022 रोजी पळून गेला होता.


तेव्हापासून पोलीस पथके त्याचा शोध घेत होते. परंतु तो मिळून येत नव्हता. कायदेशीर रखवालीतून पळून गेल्याने त्याच्यावर पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे पोलीस कोठडीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर सदर गुन्ह्याचा आढावा घेऊन नमूद फरार आरोपीस ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.


त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर श्री. डॅनियल बेन यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक बनवून त्यांना मार्गदर्शन व सूचना करून नमूद फरार आरोपीला ताब्यात घेण्याकरिता प्रयत्न करण्यात येत होते. नमूद फरार आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीवरून दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी सदरचे पथक लातूर येथील गरुड चौक परिसरात कसबे यास ताब्यात घेण्यात आले.


सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, पोलिस अंमलदार बालाजी जाधव, खुरर्म काजी, सचिन मुंडे, दिनेश देवकते, प्रमोद तरडे, विनोद चिलमे, यशपाल कांबळे, रवी गोंदकर, यांनी केली आहे.

Comentários


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page