top of page

शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू...


मुंबई- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून या सरकारने अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. अशाच एक महत्वाचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून महागाई भत्ता वाढीची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. आज राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील 34 टक्के महागाई भत्ता मिळावा यासाठी एसटी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या होत्या. याबाबत या संघटना वारंवर सरकारकडे मागणी करत पाठपुरावा करत होत्या. त्यासोबत या संघटनांनी सरकारला आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला होता. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. पण एसटी कर्मचाऱ्यां मात्र 28 टक्के टक्के महागाई भत्ता मिळत होता. या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित 6 टक्के महागाई भत्ता मिळावा म्हणून एसटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सलग तीन वेळा भेट घेतली होती. या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत 34 टक्के महागाई भत्ता लागू केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रयत्नांना यश आले. 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाने अधीकृत पत्र महामंडळात पाठवले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी कर्मचारी संघटना आणि राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सरकारचे आभार मानले आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page