लाल बहादूर शास्त्री विद्यालयात १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार...

लातूर- येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात १९९७-९८ च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र गिरवलकर होते. प्रारंभी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका साधना साखरे यांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. तत्कालीन मुख्याध्यापक शरणप्पा स्वामी, संजय टेकाळे, सुनील बिराजदार, साधू सांडे, बालाजी साळुंके, राजेश्वर हरनाळे, संजीवनी पाटील उपस्थित होते. यावेळी दिवंगत माजी सहशिक्षक स्व. गंगाधर वाडकर व नामदेव भगत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मळभागे व बालकृष्ण साळुंके यांनी केले. जवळपास २४ वर्षांनी त्याच शाळेत एकत्र आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे बदलेले स्वरूप पाहून समाधान व्यक्त केले. येथील शिक्षक एवढ्या वर्षांनीही ज्ञानदानाचे कार्य यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्याला तंत्रज्ञानाची जोड त्यांनी दिली आहे, हे पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला. स्नेह मेळाव्यात मित्र - मैत्रिणींनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या बॅचचे काही विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात, काही इंजिनिअर, काही बँकेत, काही आदर्श शिक्षक आहेत, काही पत्रकार आहेत, काही चांगले उद्योगपती एवढेच नाही तर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास या शाळेत एवढा झाला की, एक विद्यार्थी नगरसेवकही आहेत. समाजकार्यात सहभागी असलेले विद्यार्थी आहेत. हे स्वतः आपली ओळख देऊन माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याचीही ओळख करून दिली.
विद्यार्थ्यांनी दिवसभर शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. आई - वडीलांचे कष्ट, आशीर्वाद व शिक्षकांचे मिळालेले मोलाचे मार्गदर्शन हीच आपल्या यशाची गुरूकिल्ली असल्याचे माजी विद्यार्थी सुनील राठोड, प्रवीण भडंगे यांनी सांगितले. आभार प्रदर्शन सुजाता काळे हिने मानले.
यावेळी रविकिरण कांबळे, सुधाकर सूर्यवंशी, बाळकृष्ण साळुंके, मारोती हजारे, मकरंद उजनीकर, अमित शिंदे, नितीन सूर्यवंशी, लक्ष्मी शिंदे, सुजाता काळे, वैशाली जगताप, महादेवी हिरे, आशा माने, विद्या मजगे, अश्विनी मळभागे, गौशिया पठाण, अनंत गायकवाड, गणेश जाधव, शिवशंकर स्वामी उपस्थित होते.
Comments