top of page

पेपर पॅटर्नबद्दल MPSC चे विद्यार्थी पुन्हा आक्रमक; मागण्यांसाठी राज्यभरात तीव्र आंदोलनाला सुरुवात...


पुणे- आज राज्यभरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. याचे पडसाद सर्वंत्र उमटताहेत. नवीन अभ्यासक्रमासंदर्भात हे आंदोलन केले जात आहे. पुण्यात हजारो विद्यार्थी ची तयारी करत आहे. परंतु शासन आपले धोरण वारंवार बदलत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. हे विद्यार्थी आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष सरकारी नोकरी मिळवण्यासाठी घालवतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु केले.


परंतु त्यांची दखल घेतली गेली नसल्याने हे आंदोलन केले जात. पुण्यात मोठ्या संख्येनं विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेत. त्यामुळं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची तयार राज्यातील लाखो तरुण करत असतात. अगदी आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष सरकारी नोकरीसाठी आणि MPSC परीक्षा पास करण्यासाठी हे विद्यारही घालवत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे. तसंच गेल्यावर्षी पुण्यातील MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपासून MPSC बद्दल विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. काही दिवसांपूर्वी MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. आता आज संपूर्ण राज्यभरातील MPSC चे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.


महिन्याचा तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त पगार आणि थेट अधिकारी होण्याची संधी; करा अप्लाय काही दिवसांपूर्वी MPSC नं परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आणि सिलॅबसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये MPSC चा संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. मात्र यावर कित्येक वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.


त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. राज्यात बेरोजगारीची भीषणता; पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी डॉक्टर्स, इंजिनीअर्सचे अर्ज तसंच गेल्या कित्येक वर्षांपासून MPSC च्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. उत्तर पत्रिकेत घोळ किंवा प्रश्नपत्रिकेत चूक होत आहे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत म्हणूनच अशा प्रकारांवर MPSC नं लक्ष द्यावं अशीही मागणी विद्यार्थी करत आहेत. तसंच आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू अशी भूमिका घेणारं ट्विट MPSC नं केलं आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे मान्य केलं जाणार नाही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तसंच MPSC विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेत माही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page