top of page

राज्याचा सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित; महाराष्ट्रात मोठे प्रकल्प येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर- कोणताही प्रकल्प तीन चार महिन्यात येतो अन् जातो, असे होत नाही. औद्योगिक प्रकल्प म्हणजे जादूची कांडी नाही. आरोप करायचे तर कुणीही करू शकतो. परंतु आमचे सरकार उद्योगांना चालना देणारे आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात मोठ्या उद्योगासाठी राज्य सरकारला आश्वासन दिले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात मोठे प्रकल्प येणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले. भंडारा येथे विकास कामांच्या भूमिपूजनासाठी जाताना ते विमानतळावर प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. ते म्हणाले, की गेल्या अडीच वर्षातील प्रलंबित होती त्यांना चालना देण्याचे काम सुरू आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करणे, यावर लक्ष केंद्रित केले आहे. रखडलेल्या प्रकल्पांना पुढे नेण्याचे काम आम्ही करीत आहोत. नजीकच्या काळात गेल्या चार महिन्यात आम्ही केलेली कामे दिसतीलच, शिवाय मागील अडीच वर्षात ‘त्यांनी’ काय केले हेही दिसेल, असे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. संजय राऊत यांच्याबाबत बोलताना मोठे नेते आहेत एवढेच बोलून मुख्यमंत्र्यांनी विषय संपवला.अनुभवाचा फायदा मिळेल उद्धव ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश घेतला.

Commentaires


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page