top of page
Search

आजपासून औरंगाबाद शहरातील रिक्षाचालकांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप...

Writer: MahaLive NewsMahaLive News

औरंगाबाद- शहरातील रिक्षाचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं आज सकाळपासून रिक्षा बंद ठेवण्याची घोषणा औरंगाबाद रिक्षा चालक-मालक संघटनेकडून करण्यात आला. या संपामध्ये 15 रिक्षा चालक संघटना सहभागी असल्याची माहिती आहे. त्यामुळ आज औरंगाबादकरांचे हाल होण्याची शक्यता असून, घराबाहेर निघताना पर्यायी वाहतुकीची सोय प्रवाशांना करावी लागतेय. अनेकदा मागण्या करुनही रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप रिक्षा चालक-मालक समितीतर्फे करण्यात आल आहे.


अनेकदा रीतसर निवेदन देऊन देखील आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शहरातील विविध 15 रिक्षा चालक-मालक संघटनांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केल्याचं सांगण्यात येत आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या रिक्षांच्या बंदमुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या औरंगाबादकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. आज सकाळी रेल्वे स्थानकावर रेल्वेने आलेल्या प्रवाशांना ताटकळत उभा राहण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं. रिक्षाचे इन्शुरन्स, पीयुसी, टॅक्स, मीटर कॅलिब्रेशन करणे, फिटनेस, वाहन पासिंग करणे इत्यादी कागदपत्रांसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ मिळाली तर सर्व वाहन चालक व मालकांना दिलासा मिळू शकतो, अशी प्रमुख मागणी रिक्षाचालक संघटनेकडून करण्यात आली आहे.


रिक्षा चालकांच्या भविष्याचा विचार करून 283 च्या कलमाखाली रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करू नयेत. वाळूज एम.आय.डी.सी. ते सिडको, हडकोमध्ये प्रायव्हेट सेक्टर कंपनीच्या बस चालकांकडून अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, ट्रॅफिक पोलिसांकडून सुरू असलेली मोहीम बंद करून रिक्षा चालकांना होणारा मनस्ताप थांबवण्याची मागणी देखील रिक्षाचालक संघटनांनी केली आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page