लातूर शहरातील तरुणाला बिझनेस डीलसाठी बोलवून दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतून उचलले..

महालाईव्ह न्यूज | लातूर- शहरातील तरुणाला बिझनेस डीलसाठी फोन द्वारे आरोपींनी पुणे येथे बोलून तेथून विमानाने दिल्लीला बोलावून डांबून ठेवले. तरुणाच्या कुटुंबीयांना ४५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. पोलिस पथकाने दिल्लीतून तरुणासह मित्राला डांबून ठेवणाऱ्या दहापैकी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना दिल्लीतून उचलले आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी अनिल यादवराव जाजनूरकर (वय ५९, रा. एलआयसी कॉलनी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. व्यवसायाच्या बोलणीसाठी मुलासह मित्राला पुण्यात बोलावून घेतले. तेथून तुम्ही दिल्लीला विमानाने या, असे सांगण्यात आले. ते दोघेही विमानाने दिल्लीला गेले. तेथे दहा जणांनी त्यांना डांबून ठेवले.
फिर्यादीचा मुलगा आणि मित्राकडून १५ लाख घेतले. त्याचबरोबर आणखी २५ लाखांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिस अधीक्षक सोयम मुंडे यांनी पथक नियुक्त करून सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे, सहायक फौजदार विलास फुलारी, पोलिस हवालदार दिनेश हवा, सारंग लाव्हरे यांचे पथक तातडीने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमधून सागर अनिल जाजनूरकर आणि संदीप जनक मांजरे यांची सुटका केली. यावेळी संजयकुमार महावीर सिंग (वय ३६, रा. सेक्टर- ७ दिल्ली), महेश सतीश अरोडा (वय ४०, रा. पीरमुचल्ला झिरकपूर एसएएस नगर, मोहाली पंजाब), अतुल वीरेंद्र उपाध्याय (वय ३७, रा. मणीमांजरा चंदीगढ), वीरसिंह जयेश रावत (वय ४४, रा. गढवाली मोहल्ला, लक्ष्मीनगर, दिल्ली) यांना अटक करून शुक्रवारी लातूर शहरात आणले. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुधाकर बावकर, पोउपनि महेश गळगटे, सपोनि. रामचंद्र केदार, बालाजी गोणारकर, विलास फुलारी, दिनेश हवा, सारंग लाव्हारे, संजय बेरळीकर, खंडू कलकत्ते, सय्यद बहादूर, वाजीद चिकले, अनिता सातपुते, गणेश साठे, हल्लाळे, कलबुणे, चालक मरे यांच्या पथकाने केली आहे. दिल्लीतील आरोपींनी लातुरातील तरुणासह त्याच्या मित्राचे अपहरण करून १७ लाख रुपयांची मागणी केली. ती रक्कम रोख आणि ऑनलाईन घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील इतर सहा आरोपी फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिस पथक मागावर आहे.
Comments