हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, 7 जणांवर गुन्हा दाखल...

#लातूर- जिल्ह्यात अवैधरितीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले आहेत. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस ठाणे रेणापूरचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर तालुक्यातील वसंतनगरतांडा येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि रेणापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच 81 हजार लिटर रसायन व साहित्य असा एकूण किंमत 3 लाख 87 हजारांचे साहित्य नष्ट केले आहे. सुखदेव खंडू राठोड, रमेश भाऊसाहेब चव्हा, बालाजी भानुदास चव्हाण, विनायक भानुदास चव्हाण, फुलाबाई गणू चव्हाण, बालाजी सुखदेव राठोड, बाबाराव माणिक पवार ( सर्व रा. वसंतनगर तांडा) यांच्याविरुद्ध रेणापूर येथे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, रामहरी भोसले, युसुफ शेख, राहुल सोनकांबळे, प्रमोद तरडे, रामदास नाडे, नितीन कटारे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, हरून लोहार, यशपाल कांबळे, नागनाथ जांभळे, प्रदीप चोपण तसेच रेणापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गुळभिले, पोलीस नाईक ठाकरे, महिला पोलीस अंमलदार पवार यांनी केली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, ९४०४२७७७३१ Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments