लातूरात कोरोनाची परिस्तिथी गंबीर; विक्रमी आकडा, १४०४ जणांना कोरोनाची लागण; ४०५३१ पॉसिटीव्ह रूग्ण...
- MahaLive News
- Apr 9, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २२०० आरटीपीसीआर चाचणी व ३६५० रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १४०४ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ४० हजार ५३१ झाली आहे. आणि, आज ४ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १४०४ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ४० हजार ५३१ झाली. आतापर्यंत ३१ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण ८३२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ५५५ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १७०३ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील ४२३ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ५६४३ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण ८३२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - २२००
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ३६५०
आजचे रूग्ण - १४०४
एकुण रूग्ण - ४०५३१
बरे झालेले रूग्ण - ३१४१०
ऍक्टिव्ह रुग्ण - ८३२४
आजचे मृत्यू - ४
एकुण मृत्यू - ७९७
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments