लातूर जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी; पण मृत्यू वाढतेच…
- MahaLive News
- May 17, 2021
- 1 min read

#लातूर– जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण येण्याचे प्रमाणात लक्षणीय घट होताना दिसत असली तरी मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. शनिवारी (ता. १५) केवळ ३९५ नवे रुग्ण समोर आले तर ३७ जणांचा कोरोनाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी ९७७ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या.

यात १८६ जण पॉझिटिव्ह आले तर एक हजार ९३५ जणांच्या अँटीजेन टेस्ट झाल्या. यात २०९ जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. असे एकूण ३९५ नवीन रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, उपचार सुरू असताना ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ हजार ८७२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात सध्या सहा हजार ८९६ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार ७६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७६ हजार २०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
लातूर कोरोना मीटर
एकूण बाधित – ८४८७२
उपचार सुरू असलेले – ६८९६
बरे झालेले – ७६२०८
मृत्यू – १७६८
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here… @महालाईव्ह न्यूज लातूर
Comments