लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना घरपोच अनुदान वाटपाला प्रारंभ...
- MahaLive News
- May 15, 2021
- 2 min read

#लातूर- राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकात आव्वलस्थानी असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने राज्य शासनामार्फत निराधार, अपंग, वृध्द व्यक्तीचे अनुदान आलेल्या लाभार्थ्यांना कोविड १९ च्या अडचणीच्या प्रसंगी जिल्हा बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच शाखेतून थेट लाभार्थ्यांना घरपोच सेवा देणार असून त्यादृष्टीने जिल्हा बँकेच्यावतीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोनाच्या कठीण परिस्थितीत निराधार योजनेच्या लोकांना आधार देण्याचे काम लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामूळे जिल्ह्याची कल्पवृक्ष असलेली लातूर बँक सलग दुसऱ्या वर्षीही घरपोच सेवा देणारी बँक ठरली असून लोकांनां घरपोच पैसै देणारी जिल्यातील पहिलीच बँक आहे. राज्य सरकारने जिल्ह्यातील निराधार, अपंग, वृध्द लोकांसाठी अनुदान वाटपाचे चेक व लाभार्थ्यांच्या याद्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुका स्तरीय शाखेत पाठवले आहेत. त्यात एकूण रक्कम २७ कोटी ७१ लाख रुपये जिल्हा बँकेस प्राप्त झाले असून बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून निराधार लोकांना पैसै वाटप सुरू करण्यात येत असून लातूर जिल्ह्यातील सर्वच शाखेतून निराधार लोकांना पैसै घरपोच सेवा बँक देणार असल्याचे म्हटले आहे. राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच शाखेतून निराधार लोकांना पैसै वाटप करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा बँकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांची टीम तयार करण्यात आली असून बँकेच्या शाखेत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड. श्रीपतराव काकडे, व्हाइस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ कार्यकारी संचालक हणमंत जाधव व सन्माननिय संचालक मंडळ यांनी केले आहे. तालुकास्तरीय अनुदान खालीलप्रमाणे :
● लातूर तालुका : ८ कोटी २५ लाख रुपये ● औसा- २ कोटी ५७ लाख ● निलंगा -४ कोटी ४२ लाख ● देवणी – १ कोटी ८० लाख ● शिरूर अनंतपाळ – ३ कोटी ४८ लाख ● उदगीर – १ कोटी ३२ लाख ● जळकोट – १ कोटी ४ लाख ● अहमदपूर – १ कोटी ६३ लाख ● चाकुर – ७७ लाख ● रेणापूर – २ कोटी ४३ लाख
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर
コメント