top of page

लातूरमध्ये मनपाचे आणखी एक डेडिकेटेड कोरोना सेंटर; ९० बेड ऑक्सिजनचे व २०० अलगीकरण बेड उपलब्ध...


#लातूर- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत असल्याच्या समस्या समोर येत आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता कोविड केअर सेंटरची संख्या देखील वाढवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलांच्या वसतिगृहात मनपाच्या वतीने डेडिकेटेड कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचे ९० बेड व २०० अलगीकरण बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिकेने डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर उभारणीला गती दिली. या कोविड केअर सेंटर मध्ये ऑक्सिजनच्या ९० खाटा उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी ऑक्सिजन पाईपलाईन करण्यात आली आहे. यात सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमुळे बेडचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना बेड मिळण्यास अडचण येत असल्यास मनपाच्या हेल्पलाईन किंवा या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page