लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर ते कोरोना प्रसारक केंद्र होईल; मुख्यमंत्री...

#मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनकरित्या वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत ब्रेक दि चेन लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यात स्थिती अद्यापही पूर्ण आटोक्यात न आल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला जाईल असे संकेत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याच प्राश्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे. उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यासाठी काही मोठी घोषणा करणार का ? याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून सुरु होणाऱ्या १८ वर्षावरील लासिकरणावर भाष्य केले आहे. उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होतंय, उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझं वचन आहे, माझ्या नागरिकांचं लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका. लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर कोरोना प्रसारक केंद्र होईल. काळजी घ्या. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments