राज्यातील काही जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद; तर म्यूकरमायकोसिससाठी 30 कोटींची तरतूद...
- MahaLive News
- May 25, 2021
- 1 min read

#मुंबई- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यापुढे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी होमआयसोलेशन बंद करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यापुढे प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णावर कोविड सेंटरमध्येच उपचार होतील, असेही टोपे म्हणाले. यावेळी त्यांनी म्यूकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन-बी या औषधासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेशही दिले. तसेच यासाठी 30 कोटींची तरतूद केली असल्याचेही ते म्हणाले.

आज झालेल्या बैठकीत कोरोना संदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्या 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे. त्या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करून कोविड केअर सेंटर वाढवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर, तर पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांवर आल्याचे टोपे म्हणाले. तसेच राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.5 टक्क्यांपर्यंत घटल्या असल्याचीही माहिती राजेश टोपेंनी दिली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments