राज्यात ‘म्यूकरमायकोसिस’चे पंधराशेच्यावर रुग्ण; राजेश टोपे…
#मुंबई- म्यूकरमायकोसिसचे राज्यात पंधराशेच्यावर रुग्ण आहेत. या आजारावर एम्फोटेरेसींन-बी हे इंजेक्शन प्रभावी असल्याने त्याची मागणी वाढली आहे. एम्फोटेरेसींन-बीची किंमत दहा हजार रुपये एवढी आहे. एका रुग्णांना दहा ते बारा इंजेक्शन लागत असल्याने या आजारावर उपचार खूप खर्चिक होत आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी एम्फोटेरेसींन-बीचे उत्पादन वाढवून किंमत निश्चित करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. म्यूकरमायकोसिसचे रुग्ण महाराष्ट्रात वाढत असून, आतापर्यंत राज्यात पंधराशेच्या वर या रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये म्यूकरमायकोसिस या नवीन आजारावर चर्चा झाली. या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलले पाहिजे यासंबंधीचं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे व्यक्त केले. ज्या रुग्णांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी आहे. अशा रुग्णांना म्यूकरमायकोसिस आजार जडतो. या आजारामुळे रुग्णांच्या नाक-कान-घसा आणि डोळे याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असल्याचं दिसून आला आहे. या आजारावर रामबाण औषध म्हणून एम्फोटेरेसींन-बी हे इंजेक्शन आहे. मात्र सध्या या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असल्याने या इंजेक्शनची किंमत जवळपास दहा हजार रुपयापर्यंत गेली आहे. प्रत्येक रुग्णाला जवळपास 10 ते 12 इंजेक्शन लागत असल्याने या आजाराचा उपचार देखील मोठा खर्चिक होत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची किंमत लवकरात लवकर कमी करून निर्धारीत करण्यात यावी, अशी मागणीही राजेश टोपे यांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या आजारावर उपचार केले जाणार आहेत. मात्र या आजाराच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागणार असल्याचे यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच या रोगाबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. त्यामुळे या रोगाबद्दल जनजागृती करणे ही गरजेचं असल्याचं यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. एम्फोटेरेसींन-बी इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याची गरज असून त्या उत्पादनाचा अधिक कोटा महाराष्ट्राला देण्यात यावा, असंही यावेळी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सांगितले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता Click Here
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments