राज्यात धोका वाढतोय; म्यूकरमायकोसिस ने घेतले 90 बळी…

#मुंबई– कोरोना महामारीनं देशभरात हाहा:कार माजवला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. राज्यात दररोज 40 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना राज्यात म्यूकरमायकोसिसचं नवीन संकट ओढावलं आहे.

म्यूकरमायकोसिस मुळे राज्यात आतापर्यंत 90 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही महिती दिली. म्यूकरमायकोसिस मुळे राज्यात आतापर्यंत 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 500 पेक्षा जास्त जणांनी म्यूकरमायकोसिस आजारावर मात केली आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 850 पेक्षा जास्त म्यूकरमायकोसिस रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्यूकरमायकोसिस वरील उपचार खर्चीक असल्यामुळे सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितलं. म्यूकरमायकोसिस आजारावरील इंजिक्शनाची राज्यात टंचाई असून केंद्र सरकारनं त्वरित वाढीव साठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही यावेळी टोपे यांनी केली.म्यूकरमायकोसिस (काळी बुरशी) आजार चिंता वाढवणारा आहे. या आजारावर बुरशीविरोधी औषधं प्रभावी ठरत असून त्याची टंचाई आहे. राज्यानं सध्या १ लाख ९० हजार अॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. पण ज्या फार्मा कंपन्या हे इंजेक्शन बनवतात ते सध्या याचा पुरवठा करत नाहीएत. कारण याच्या पुरवठ्यावर पूर्णपणे केंद्र सरकारचं नियंत्रण आहे. त्यामुळे राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक असल्यानं केंद्रानं लवकरात लवकर राज्याला उपलब्ध करुन देण्याची परवानगी द्यावी.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comentarios