top of page
Search

राज्यात आज संध्याकाळपासून पहिला विकेंड Lockdown; शुक्रवारी सायंकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत असेल

Writer: MahaLive NewsMahaLive News

#पुणे- पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात वीकेंड (शुक्रवारी सायंकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत) लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामधील पहिला लॉकडाऊन आज (दि. 9 एप्रिल) संध्याकाळपासून होत आहे. राज्यात सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन असेल. आज संध्याकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल.हे राहणार सुरू…

- सर्व शेतीकामे, उद्योग व्यवसाय सुरू

- एका रिक्षात दोनच प्रवाशांना परवानगी - विवाह समारंभ, अंत्यविधीला परवानगी (घातलेल्या नियमांनुसार)

- खासगी कार्यालयांना 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना

- बँक, विमा आणि मेडिक्लेमसारखी कार्यालये सुरू

- मंत्रालय आणि सरकारी कार्यालये 50 % क्षमतेने सुरू

- वृत्तपत्रांची छपाई, वितरण सुरू

हे राहणार बंद…

- बार आणि रेस्टॉरंटवर निर्बंध, पार्सल सेवा सुरू

- गर्दीची शक्यता असलेल्या ठिकाणी शूटिंगला परवानगी नाही

- कंटेन्मेंट झोनमध्ये एकदम कडक निर्बंध

- धार्मिक स्थळांसाठी नियमावली

- सोसायटीने नियम मोडले तर 10 हजार दंड

- राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी

हे निर्बंध लावताना राज्याच्या अर्थचक्राला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील. सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक व्यवस्था नियमितपणे सुरू राहील. मात्र, 50 टक्केच प्रवासी प्रवास करू शकतील.

अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरू

- किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचार्‍यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.

शेतीविषयक कामे सुरू…

- शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

सर्व प्रकारची वाहतूक 50 % क्षमतेने सुरू

- सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.

- बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणार्‍या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभा राहून प्रवास करू नये तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

खासगी कार्यालयांत पूर्णतः Work From Home.

- खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणीपुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.

शासकीय कार्यालयांना 50 % उपस्थितीचे बंधन

- शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत, तेथील कर्मचारी उपस्थिती 50 % मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचार्‍यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.

चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, सलून्स बंद…

- मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क पूर्णपणे बंद राहतील. सर्व कटिंग सलून्स, ब्यूटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. या ठिकाणच्या कर्मचार्‍यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे. प्रार्थनास्थळे दर्शनार्थीसाठी बंद

- सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थनास्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील. मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा-अर्चा करता येईल. या कर्मचार्‍यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा…

- रस्त्याच्या कडेला असणार्‍या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणार्‍या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासनास ते पूर्णपणे बंद करता येईल.

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद…

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणार्‍या अभ्यागतासाठीच सुरू ठेवता येईल. बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र 'टेक अवे' किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.

ई कॉमर्स सेवा सुरू…

- ई-कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणार्‍या कर्मचार्‍यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबंधित दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.

- शाळा-महाविद्यालये बंद राहतील. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

- मात्र दहावी व बारावी परीक्षांचा अपवाद असेल.

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू…

- उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील. मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत, याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी. चित्रीकरण सुरू ठेवता येईल. मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांना आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.

…तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट Zone

- पाचपेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार, बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.

'त्या' कामगारांना कामावरून काढता येणार नाही…

- बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोरोना झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल. कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.

@महालाईव्ह न्यूज पुणे

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page