म्युकरमायकॉसिसच्या रूग्णांवर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनतून मोफत उपचार…

#लातूर-महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना या आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांमध्ये दुर्मिळ असलेल्या बुरशीजन्य आजार बळावत असल्यची उदाहरणे राज्यभर दिसून येत आहेत. म्युकरमायकॉसिसच्या आजाराची दिव्रता जास्त असून या बुरशीच्या बाधेमुळे संबंधित रूग्णांचा चेहरा,नाक,डोळे व मेंदू यावर दुष्परिणाम होऊ शेकतो.

त्याप्रमाणे मधुमेह आजार असलेल्या व्यक्तीमध्ये या आजाराची बाधा होण्याचे प्रमाण आधिक आहे.तसेच याकरिता बहुआयामी विषेज्ञ सेवांची गरज भासते. त्याचप्रमाणे या आजाराच्या उपचारासाठी येणारा खर्चही जास्त आहे. म्युकरमायकॉसिस या आजारामुळे काही वेळा रूग्णांचा मृत्यू सुध्दा होत आहेत. याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली असून महाराष्ट्र शासनाने या कोरोना महामारीच्या काळात आगोदरच आर्थिक टंचाईने त्रस्त असलेल्या रूग्णांना आर्थिक झळ सोसावी लागू नये व आरोग्य विषयी हमी मिळावी या दृष्टीने या आजाराच्या उपचाराचा समावेश महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्या योजनेत केलेला आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या उपचार व शत्रक्रिया अशा एकूण 19 पॅकेजसचा या योजनमध्ये समावेश केलेला आहे. तसेच रूग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ तज्ञ डॉक्टरांना दाखवून या योजनेचा लाभ जास्तीत-जास्त रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments