top of page

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर द बर्निंग कारचा थरार; धावत्या कारने घेतला पेट…

#पुणे- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर आज दुपारच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या शेवरोलेट क्रूज कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. मुंबईकडे जाताना कामशेत बोगद्याजवळ कारच्या इंजिनमधून धूर येत असल्याची माहिती चालकाला कळताच प्रसंगावधान राखत चालकाने कार सर्विस लेनवर उभी केली आणि पाहिले असता समोरील दर्शनी भागाने अचानक मोठ्या प्रमाणात पेट घेतला.

काही मिनिटातच कार पूर्णपणे जळून राख झाली. मात्र संबंधित घटना वेळीच लक्षात आल्याने कारमधील एक महिला तसेच दोन पुरुष कारमधून बाहेर पडले. त्यामुळे या सर्वांचे प्राण वाचले आहेत. महामार्ग पोलीस आयआरबी आणि देवदूत यंत्रणा यांच्या जवळपास तासाभराच्या परिश्रमानंतर कारला लागलेली आग पूर्णपणे विझवण्यात आली. अपघाता दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव रोखून धरण्यात आली होती, त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच प्रकारे पुण्यात एका धावत्या कारला अचानक आग लागली होती.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

@महालाईव्ह न्यूज पुणे

May be an image of text that says 'LiVE GEI Mahalive Store अधिक बातम्यांसाठी महालाईव्ह न्युज ॲप डाऊनलोड करा... GE Google Play Mahalive.news fMahalive.news Available on the App Store Mahalivenews Mahalive 99096509777'

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page