Search
महालाईव्ह न्युज; ५० सर्वात महत्वाच्या बातम्या @ १० AM । १०-मे-२०२१ । Mahalive News

आपल्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या साठी जिल्ह्यावर क्लिक करा...
● तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोना संसर्ग! 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण...
● पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल...
● लसीकरणाआधी होणार रॅपिड अँटीजेन चाचणी, संगमनेरात होणार राज्यातील पहिलाच प्रयोग...
----------------------
महालाईव्ह वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९०९६५०९७७७
----------------------
● यवतमाळ येथे मृतदेहाची अदलाबदल; संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड...
● देशात कोरोना लसीकरणानं गाठला 17 कोटींचा टप्पा, मागील 24 तासात 20 लाख लोकांना लस...
लातूर
● शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथे वास्तव्यास असलेले सर्पमित्र अभिजीत कासराळे (वय २२) यांचे सर्पदंश होऊन निधन झाले...
● बनवस येथील आ. विनोबा भावे आश्रम शाळेतील प्रा. शिवराज आंधळे (वय ३९) यांचे कोरोनाने अकाली निधन झाले...
● अहमदपूर शहरात नाल्या तुंबल्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात...
● जिल्ह्यातील पाच-सहा तालुक्यांमध्ये रविवारी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाचा वादळासह तडाखा बसला, तर विजा कोसळून दोन नागरिकांसह २५ जनावरे ठार झाली...
यवतमाळ
● वीज कंपनीतील ३२ हजार कंत्राटी कामगार वाऱ्यावर; कामावर असताना वर्षभरात ४१ जणांचा मृत्यू...
● मृतदेह बदलल्याने शहा हाॅस्पिटलमध्ये तोडफोड; नातेवाईकांमध्ये संताप, यवतमाळमधील घटना ...
● वाटणीवरून सावत्र आईचा काटा काढणाऱ्या मुलाला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा...
उस्मानाबाद
● ट्रॅक्टर व मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश करून पोलिसांनी मुद्देमालासह तिघांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुळजापूर येथून एकास तर लोहारा येथून दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी तुळजापूर व लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला...
● जुन्या भांडणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उमरगा तालुक्यातील मातोळा (बोरी) येथे घडली. याप्रकरणी १७ जणाविरूध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद...
● सासरच्या छळास कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना कळंब तालुक्यातील नायगाव येथे घडली...
नांदेड
● जिल्ह्यात रविवारी १ हजार ८५० अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी १ हजार ४९६ निगेटिव्ह, तर ३३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, एकूण रुग्णसंख्या आता ८४ हजार ९६१ वर पाेहोचली...
● जिल्ह्यात दोन दिवसांत ३ हजार ३०० रेमडेसिविर प्राप्त; जिल्ह्यात प्राप्त झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनपैकी १० टक्के साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे....
● वाईच्या महारक्तदान शिबिरास प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक वाॅर्डात लसीकरण केंद्र असावे; ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय डहाळे यांची मागणी ...
● अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बीडीएस प्रणाली सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते, याची दखल घेत शासनाने बीडीएस प्रणाली सुरू केल्याची माहिती राज्य संयुक्त संघटक चंद्रकांत मेकाले यांनी दिली...
पुणे
● पुणे शहरात दिवसभरात २०२५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. पुणे शहरात दिवसभरात ४८२५ रुग्णांना डिस्चार्ज...
● कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची दुसरी लाट भयानक आहे, परंतु यामध्ये न घाबरता कसे बाहेर पडू, यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे : आदित्य ठाकरे...
● पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील निराधार लहान मुलांसाठी चालवीन्यात येत असलेल्या सार्थक अनाथ आश्रमात कोरोनाचा शिरकाव; आश्रमतील तब्बल १९ मुलांना कोरोनाची बाधा...
● दौंड तालुक्यातल्या कासुर्डी येथील एका शेतकऱ्याच्या कांदा वखारीस आग लागल्याची घटना घडली आहे, या आगीत जवळपास ५५ टन कांद्याचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे...
● पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ९ लाख १३ हजार ६१८ इतकी असून, त्यापैकी ७ लाख ९९ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले ...
● शिरुर तालुक्यातील नवले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, या कुटुंबातील तीन भावांचा अवघ्या १५ दिवसात कोरोनाने मृत्यू झाल्याने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे ...
मुंबई
● विजेचा शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू झाला. रबाळे एमआयडीसीमधील मॅचव्हील सिंडिकेट कंपनीत हा प्रकार घडला आहे...
● नवी मुंबईकरांचाही प्रवास डिसेंबरपासून मेट्रोमधून ; तळोजातील चाचणी यशस्वी : ८५० मीटर लांबीच्या मार्गावर सराव...
● लस खरेदीसाठी महापालिकेला एक कोटीचा निधी, ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ५० लाख; मंदा म्हात्रेंचा पुढाकार ...
● नवी मुंबईतील फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही; घोषणा केल्याने मदतीची प्रतीक्षा : १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले ...
बीड
● जिल्ह्यात दिवसभरात 1273 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले...
● तेलगावसह धारूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...
● बीडच्या आरोग्य विभागाने 105 कोरोनाबळींचा आकडा लपविला...
● सिरसाळयात अवकाळी पावसाचा धुमाकूळ उन्हाळी पिकासह वीटभट्टी चालकांचे झाले नुकसान...
● लाॅकडाऊनचे उल्लंघन; मोंढ्यात अकरा दुकाने सील ...
औरंगाबाद
● जिल्ह्यात दिवसभरात 759 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर 22 रुग्णांचा मृत्यू...
● शहागंज, चेलीपुरा, सिटी चौकात नागरिकांची प्रचंड गर्दी, प्रशासनाचे दुर्लक्ष...
● सर्वसामान्य कामगारांना रेशन कार्ड ऐवजी आधार कार्डवर धान्य द्यावे; मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी...
● शहरातील नऊ दुकानावरती दंडात्मक कारवाई , नऊ दुकाने केली सील; सिटी चौक परिसरात झाली कारवाई...
● संकटाच्या काळात विरोधी पक्षाने केवळ राजकारण न करता लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत; विजय चोरमारे यांचे प्रतिपादन...
● उद्योजक सुनील नवले यांचे निधन; एकाच महिन्यात नवले कुटुंबातील चौघांचा मृत्यू...
● शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करा; औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला निर्देश ...
● पैठण ग्रामीण रुग्णालयात 30ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण होणार; रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या सूचना...
नाशिक
● 18 वर्षावरील लसीकरण नोंदणी अवघ्या काही सेकंदात फुल होत असल्याने वेबसाईट संशयाच्या भोवऱ्यात; वेबसाईट हॅक झाल्याचा संशयाला काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दुजोरा...
● मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यातील संभाषण लिक प्रकरणाच्या तपासासाठी नाशिकचे विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती...
● ईडी च्या कारवाईची धमकी देत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न; संचालक दिलीप थेटे यांची सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...
● तिसऱ्या लाटेची दाट शक्यता लक्षात घेता मनपाकडून लहान मुलांसाठी 100 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी; मनपा आयुक्त कैलास जाधव यांची माहिती ...
● राजकीय पुढाऱ्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन न करता कायदा हातात घेतल्यास गुंडा अॅक्टप्रमाणे कारवाई होणार; सभागृह नेत्याच्या ऑफिस तोडफोडीनंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचा राजकीय नेत्यांना इशारा ...
अमरावती
● शेजारच्या जिल्ह्यातील नागरिकांची अमरावती जिल्ह्यात लसीकरण भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे तक्रार...
● आरोग्य विभागाकडून लसीकरण; गजानन महाराज सार्वजनिक मंडळातर्फे मेळघाटातील रुग्णांना करण्यात आले जेवणाचे वाटप...
● जिल्ह्याला अजून आठ दिवस करावा लागेल उन आणि पावसाचा सामना; जिल्ह्यात गर्मीचा तडाखा वाढला ...
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज
Comments