मराठवाड्यात कोरोनाने १०८ जणांचा मृत्यू; तीन हजार ३२६ जणांना नव्याने बाधा…
- MahaLive News
- May 17, 2021
- 1 min read

#औरंगाबाद– मराठवाड्यात रविवारी (ता. १६) दिवसभरात ३ हजार ३२६ कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; बीड ८९७, औरंगाबाद ६६९, उस्मानाबाद ४९२, लातूर ३९५, जालना २७६, नांदेड २७३, परभणी २५३, हिंगोली ७१. उपचारादरम्यान आणखी १०८ जणांचा मृत्यू झाला. त्यात लातुरमध्ये ३७, औरंगाबाद १८, परभणी १४, नांदेड १०, उस्मानाबाद- बीडमध्ये प्रत्येकी ९, जालना ६, हिंगोलीतील पाच जणांचा समावेश आहे. औरंगाबादेत १८ जणांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत २ हजार ९२२ जणांचा मृत्यू झाला आहे. बिडकीन (ता. पैठण) येथील पुरुष (वय ५०), आडेगाव (जि. औरंगाबाद) येथील महिला (७०), सिडको एन-आठ, कोर्ती हाउसिंग सोसायटीतील पुरुष (३२), हर्सूल सिटी येथील महिला (७२), जरंडी (ता. सोयगाव) येथील महिला (६०), एसबीएच कॉलनी औरंगाबाद येथील महिला (७५), पिरोळा (ता. सिल्लोड) येथील पुरुष (७३), चेतनानगर, हर्सूल येथील महिला (५१), कारखाना फुलंब्री येथील महिला (३०), शंभूनगर औरंगाबाद येथील महिला (५२), भंबरवाडी (ता. कन्नड) येथील पुरुष (३४), वाहेगाव (ता. गंगापूर) येथील पुरुष (७०), हनूमाननगर, पैठण येथील पुरुष (६०), अंबिकानगर, औरंगाबाद येथील महिलेचा (६५) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्हा रूग्णालयात व खासगी रुग्णालयात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ६६९ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरातील २०६, ग्रामीण भागातील ४६३ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ४४ झाली. बरे झालेल्या आणखी ७५४ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील १३०, ग्रामीण भागातील ६३४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख २७ हजार ५३२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६ हजार ५९० जणांवर उपचार सुरू आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here… @महालाईव्ह न्यूज औरंगाबाद
Comments