बीड जिल्ह्यात पुन्हा लागणार लॉकडाऊन; १० दिवसांचे कडक लॉकडाऊन…
- MahaLive News
- May 14, 2021
- 1 min read

#बीड-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे येथील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा देखील अपुऱ्या पडत असल्याने येथील नव्याने बाधित रुग्णांची गैरसोय होत आहे. आता या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात आता १० दिवसांचे कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले आहेत. १५ मे ते २५ मे या कालावधीत हे लॉकडाऊन असणार आहे.

कोरोना रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्यासाठी जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदींप्रमाणे जिल्ह्यात शनिवारी (दि. १५) रात्री १२ वाजेपासून ते मंगळवारी (दि. २५) रात्री १२ वाजेपर्यंत असे दहा दिवस लॉकडाऊन असणार असून कडक निर्बंध असणार आहेत. लॉकडाऊनदरम्यान लस घेण्यासाठी बाहेर पडण्यास मुभा असेल, तर बँकांना सकाळी दहा ते एक या वेळेत व्यवहार करता येतील. दुपारी एक ते सायंकाळी पावणेपाच या वेळेत बँकेतील अंतर्गत कामकाजासाठी सवलत दिली आहे. शेतीकामाला खंड पडू नये म्हणून कृषी कामासंदर्भातील दुकानांना मुभा दिलेली आहे. दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सील करून त्याचा परवाना रद्द करण्यात येइर्ल. आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस आणि सर्व संबंधित विभागाची राहील, असे आदेशात स्पष्ट केले. गॅस वितरण, दवाखाने, मेडिकल, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन, वितरण युनिट, त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल या अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही आस्थापना चालू राहणार नाहीत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज बीड
Comments