Search
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; ट्विटरद्वारे दिली माहिती...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी हा डोस घेतला. एक मार्चला त्यांनी या लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.
"कोरोना लसीचा दुसरा डोस मी आज घेतला. कोरोनाची लस घेणे हा या विषाणूला हरवण्याचा प्रभावी मार्ग आहे. जर तुम्ही कोरोना लस घेण्यासाठी पात्र असाल, तर लवकरात लवकर लस घ्या. यासाठी Co.Win.gov.in या वेबसाईटवर नावनोंदणी करा." अशा आशयाचे ट्विट करत मोदींनी याबाबत माहिती दिली.
मोदींनी या ट्विटसोबत आपला कोरोना लस घेतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. पंतप्रधानांनी कोव्हॅक्सिन ही कोरोना लस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण ९ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
@महालाईव्ह न्यूज नवी दिल्ली
Comments