धक्कादायक; नाशिकमध्ये चक्कर येऊन एका दिवसात 9 जणांचा मृत्यू...
- MahaLive News
- Apr 16, 2021
- 2 min read

#नाशिक- नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून दुसरीकडे एका दिवसात शहरात चक्कर येऊन 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात नऊ जणांच्या मृत्यूच्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त होत असून शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन रोज 2 हजाराच्या पटीत कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. 20 ते 22 जणांचा मृत्यू होतं आहे. अशात 14 एप्रिल रोजी एका दिवसात चक्कर येऊन 9 जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. बहुतांश हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाही, अशी परिस्थिती असून अशा परिस्थितीत इतर आजराचे रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. अशावेळी रुग्णांना उपचार मिळत नाही त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढली आहे. चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधार येणे, थकवा, अशक्तपणा जाणवणे, डोळे गरगरणे, डोळ्या पुढे अंधार येऊन चक्कर येण्याचे हृदविकारापासून ते अँनेमिया, असे कोणतेही गंभीर आजार असू शकते. अशक्तपणा तसेच कमी रक्तदाब, औषधे, सांधे कमजोर, मधुमेह, पैनिक अटॅक, हृदय समस्या, ताणतणाव ह्या लक्षणामुळे चक्कर व श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, अशावेळी तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. रुग्ण बरे झाल्यानंतर किमान 15 दिवस काळजी घेणे महत्वाचे असते. बरे झालेल्या रुग्णांला सहा मिनिटे वॉक टेस्ट करणे गरजेचे आहे. यात बरे झालेले वृद्ध, तरुण महिला पुरुष यांनी ही टेस्ट करणे गरजेचे आहे. रक्तातील ऑक्सिजन मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा वावर करावा. यात 90 च्याखाली ऑक्सिजन असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अनेक नागरिक कोरोना बाधित झाल्यानंतर सुद्धा उन्हात बाहेर पडत आहेत. तसेच काही रुग्णांच्या मनात कोरोना विषयी भीती निर्माण झाली आहे. तसेच काही लोक घाबरलेले आहेत. त्यामुळे फोबियामुळे काही जणांना हार्टअटॅक येऊ शकतो. घाबरून कोसळने त्यामुळे डोक्याला मार लागणे. किंवा उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होणे, अशी कोणतेही मृत्यूला कारण असू शकतात. कोणाला मनात भीती असेल तर त्याने डॉक्टरांचा सल्ला ह्यावा. गरज तेवढी विश्रांती घ्यावी, सकारत्मक विचार करावा, असं डॉक्टर वैशाली व्यवहारे यांनी सांगितलं आहे.
@महालाईव्ह न्युज नाशिक
Comments