top of page

दिलासादायक; राज्यात काल दिवसभरात 71 हजार रुग्णांची कोरोनावर मात...


#मुंबई- राज्यात गेल्या 24 तासांत 40 हजार 956 नवे रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 71 हजार 966 इतकी नोंदवली गेली आहे. राज्यात सध्या 5 लाख 58 हजार 996 सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात आज 793 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 51 लाख 79 हजार 929 इतकी झाली आहे.

राज्यात कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा 45 लाख 41 हजार 301 इतका आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 77 हजार 191 इतक्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई या शहरातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदविण्यात आल्याने महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बातमी आहे.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Commentaires


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page