चिंताजनक; लातूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर; ६०६ जणांना कोरोनाची लागण; ३२७९९ पॉसिटीव्ह रूग्ण
- MahaLive News
- Mar 31, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ७६३ आरटीपीसीआर चाचणी व २३४० रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन ६०६ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ३२ हजार ७९९ झाली आहे. आणि, आज ५ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन ६०६ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ३२ हजार ७९९ झाली. आतापर्यंत २७ हजार ५२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण ४५२५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील २२८ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील ६५३ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील २७५ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ३३६९ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण ४५२५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - ७६३
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - २३४०
आजचे रूग्ण - ६०६
एकुण रूग्ण - ३२७९९
बरे झालेले रूग्ण - २७५२३
ऍक्टिव्ह रुग्ण - ४५२५
आजचे मृत्यू - ५
एकुण मृत्यू - ७५१
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments