Search
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला आज ऑरेंज अलर्ट…
- MahaLive News
- May 17, 2021
- 1 min read

#मुंबई- अरबी समुद्रात उठलेले ‘तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मुंबईसह ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे.

दरम्यान मुंबईत रविवारी रात्रीपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मध्यरात्रीपासूनच मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here… @महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments