औरंगाबादेत आज तेरा केंद्रांवर लसीकरण राहणार सुरु…

#औरंगाबाद– महापालिकेकडे २ हजार २५० लस शिल्लक आहेत. यामुळे आज सोमवारी (ता. १७) १३ केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. यामध्ये सात आरोग्य केंद्रांवर कोविशिल्ड तर सहा केंद्रांमध्ये कोव्हॅक्सिन लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाने कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसरा डोस मध्ये कमीत कमी ८४ दिवस अंतर असणे आवश्यक केले आहे. त्यानुसार ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे.

आता त्यांना ८४ दिवस पूर्ण झाल्यावरच दुसरा डोस घेण्यासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे लागणार आहे. लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर्ससाठी कोविशिल्ड लसीचा फक्त दुसरा डोस व ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना पहिला व दुसरा डोस उपलब्ध असेल. तसेच आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर्स व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी पहिल्या डोससाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे. महापालिकेकडे कोविशिल्डच्या १ हजार ६१० लस शिल्लक आहेत. या चिकलठाणा, सिल्कमिल काँलनी, बन्सीलालनगर, सिडको एन-८, सिडको एन- ११, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिल्या आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here… @महालाईव्ह न्यूज औरंगाबाद
Comments