top of page
Search

औरंगाबादमधील 31 मार्च ते 9 एप्रिल या काळात सक्तीचा लॉकडाऊन; जिल्हा प्रशासनाचा निर्णय...

Writer: MahaLive NewsMahaLive News

#औरंगाबाद- जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी मंगळवारी उशिरा रात्री (दि.30) पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात 31 मार्च ते 9 एप्रिल या काळात सक्तीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. प्रशासनाने जाहीर केलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनला शहरातील विविध पक्ष, संघटनांनी कडाडून विरोध केला होता. तसेच लॉकडाऊनच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी दुपारी 'जनआक्रोश मोर्चा'चे आयोजन केले होते. सक्तीच्या लॉकडाऊनचा सर्व स्तरातून होत असलेला विरोध पाहता जिल्हा प्रशासनाने, राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन स्थगित केला आहे. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्यात आज (दि. 30 मार्च) मागील 24 तासांत 27 हजार 918 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 27 लाख 73 हजार 436 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र राज्यात मागील 24 तासांत 23 हजार 820 जणांना कोरोनातून बरे झाल्यामुळे रुग्णालयात सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत राज्यात 23 लाख 77 हजार 127 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 40 हजार 542 रुग्ण सक्रिय असून त्यांच्या विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. राज्यात मागील 24 तासांत 139 रुग्णांचा कोरोनावरील उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 54 हजार 422 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

@महालाईव्ह न्यूज औरंगाबाद

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page