ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्राचा मोठा निर्णय; ऑक्सिजन पुरवठ्यावर बंदी...
- MahaLive News
- Apr 19, 2021
- 1 min read

#मुंबई- कोरोना रुग्णवाढीमुळे अनेक राज्यांमधून मेडीकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने राज्यांमध्ये आरोग्यव्यवस्था ढासळण्याची भीती असून केंद्राकडे मदत मागितली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी आणली आहे. यामधून नऊ उद्योगांना वगळण्यात आले आहे. 22 एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. रविवारी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून औद्योगीकरणासाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्यास सांगितले आहे. मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत विशेष करून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्या यामध्ये समावेश आहे. तर कोणत्या उद्योगांना सूट आहे! नऊ उद्योगांना सूट दिली असून यात एमपॉल्स व वायल्स, फार्मास्युटिकल, पेट्रोलियम रिफायनरीज, स्टील प्लांटस, अणुऊर्जा सुविधा, ऑक्सीजन सिलेंडर उत्पादक, सांडपाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, अन्न व जल शुद्धीकरण प्रक्रिया उद्योगांना सूट राहणार आहे.
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments