अवकाळी पावसाचा कहर; निलंग्यात पाच गावात विज पडून आठ जनावरे दगावली...

#लातूर- गेल्या पंधरा दिवसापासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने शुक्रवारी (ता. 7) रोजी कहरच केला. निलंगा तालुक्यातील पाच गावात विज पडून आठ जनावरे दगावली असून हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर बेतला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांचे आंबा या फळपीकाचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरीही वैतागला असून शेतातील मेहनत करणे अवघड झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सरदारवाडी येथे बाबुराव तळभोगे यांच्या शेतात बांधलेले दोन हाणम जातीचे बैल व एक म्हैस विज पडून दगावली आहे. यामुळे दोन लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तांबाळा येथील तुकाराम म्हेत्रे याचे एक बैल व एक गाय विज पडून मृत झाले असून एक लाखाचे नुकसान झाले आहे. ममदापूर येथील पांडुरंग बिराजदार यांचे एक म्हैस विज पडून नुकसान झाले झाले आहे. तर ताडमुगळी येथील श्याम हिरामजी याचे एक बैल विज पडून दगावली आहे. तालुक्यातील पाच गावातील आठ जणावरे विजपडून दगावली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर बेतला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments