MahaLive News

fullDate

बीड येथे कार-ट्रॅव्हल्स अपघातात विखूरलेल्या अवस्थेत सापडले शरीराचे तुकडे...

बीड- पुण्याहून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने बीड कडे निघालेल्या कार ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार मध्ये असलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे अवयव रस्त्यावर विखूरलेले दिसले. वडवणी तालुक्यातील देवी येथील रहिवासी ग्रामसेवक राजेंद्र श्रीरंग मुंडे (41) हे कामानिमित्त सकाळी गावाहून बीडकडे आपल्या कारने निघाले होते. वडवणी- परळी राष्ट्रीय महामार्गांवर बुधवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

वडवणी शहराजवळ हॉटेल दिनेश या परिसरात त्यांच्या कार्याला पुण्याहून भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली. समोरासमोर झालेल्या या अपघातात राजेंद्र मुंढे कारमध्ये दबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ग्रामसेवक यांच्या शरीराचे तुकडे रस्त्यावर विखूरलेल्या अवस्थेत आढळला. आणि त्याचा अर्धा मृतदेह कटर ने कार चा पत्रा कापून काढावा लागला. अपघाताचा आवाज संपूर्ण वडवणी शहराला ऐकू आला. यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर मुंडे यांचा मृतदेह वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर भरधाव ट्रॅव्हल्स महामार्गाजवळ असलेल्या झाडाला धडकली. त्यामुळे ट्रॅव्हल्स थांबली पण पलटी झाली नाही. त्यावेळी पहाटे झोपेत असलेले प्रवासी अपघातानंतर दचकून जागे झाले. सुदैवाने ट्रॅव्हल्स मधील कोणी जखमी झाले नाही. या ट्रॅव्हल्स मधून सुमारे 30 ते 40 प्रवासी प्रवास करत होते.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज बीड